Home
Home Breaking News जिवती येथे आ. सुभाष धोटे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.

जिवती येथे आ. सुभाष धोटे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

जिवती :– महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या विधानसभा निवडणुक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, काँग्रेस व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून कोणत्याही अफवा व आमीषांना बळी न पडला महाविकास आघाडी चा दणदणीत विजय कसा होईल यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी असे आवाहन केले.
यावेळी जेष्ठ काँग्रेस नेते भिमराव पा मडावी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, प्रा. सुग्रीव गोतावळे, नामदेव जुमनाके, डॉ. अंकुश गोतावळे उपनगराध्यक्ष, रमेश जाधव, शिवसेना उभाठा चे तालुकाध्यक्ष प्रशांत राठोड, किसन राठोड, कैलास राठोड, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर राठोड, प्रदीप काळे, साबणेजी, आशिष डसाने, चिन्नु पा. मडावी, जब्बार भाई, शब्बीर भाई, श्यामराव गेडाम, केशव राठोड, माधव शेडके, माधव डोईफोडे, सुभाष राठोड, सुधाकर नागोसे, मुनीर भाई, ताजुद्दीन शेख, अश्फाक शेख, नंदाताई मुसने, राम चव्हाण, कराडे सर, अजगर अली, अमोल कांबळे, सतपतराव कोटणाके, बाळू पतंगे, विजय ठाकरे यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here