भटके-विमुक्त हक्क परीषद विदर्भ विभागच्या(अमरावती जिल्हा) * जिल्हा कार्यकारीणीची आढावा बैठक संपन्न*

लोकदर्शन 👉महेशजी गिरी
प्रदेशाध्यक्ष मा.श्री धनंजयजी ओंबासे सर , प्रदेशसचिव प्रा श्री सखारामजी धुमाळ * यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दिवाळीच्या नंतर आपल्या संघटनेचे *प्रदेश मुख्यसंघटक श्री पुरुषोत्तम काळे सर हे संघटन व संघटनात्मक विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात दौरा करणार आहेत म्हणुन त्यांचा दौ-या पुर्वी विदर्भातील जिल्ह्यातही बैठक होणे आवश्यक आहे त्यासाठी
भटके-विमुक्त हक्क परीषद जिल्हा कार्यकारीणी अमरावती च्या संघटन विस्तार व संघटनात्मक चर्चा करण्यासाठी मा.श्री महेश गिरी(अध्यक्ष विदर्भ विभाग) यांच्या विशेष/ प्रमुख उपस्थितीत व मा.श्री शंकरजी शिंपिकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.श्री कैलासजी पेंढारकर(जिल्हाध्यक्ष अमरावती) यांच्या नेतृत्वात ही बैठक संपन्न झाली यामध्ये श्री महेश गिरी सर यांनी भटके-विमुक्त हक्क परीषदेचे कार्य व पुढील वाटचाल तसेच संघटन विस्तार याबाबत माहिती दिली, श्री शिपिकर साहेब यांनी आम्ही हे संघटन विस्ताराचा दिशेने वाढ करु असे सांगितले, श्री पुरुषोत्तम शिंदे यांनी समाज कल्याण विभाग यांच्या मार्फत ज्या योजना आहेत त्याबाबत माहिती दिली तसेच श्री कैलास पेंढारकर साहेब यांनी समस्त अमरावती जिल्ह्यात लवकरच संघटन विस्तार करु व विदर्भात नंबर वन जिल्हा बनवू अशी ग्वाही दिली, श्री कुरई सर यांनी समस्त बांधवांनी एकत्र येऊन काम करु असे म्हटले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कैलासजी पेंढारकर यांनी केले व सुत्रसंचालन श्री सचिन करडे यांनी केले . यामध्ये काही संघटकांचा नियुक्तया केल्या त्यामध्ये
सौ.रिनाताई जुनघरे (महिला जिल्हाध्यक्ष),सौ.गंगुबाई वाघमारे(महिला संघटक),श्री रघुनाथजी पवार(कार्याध्यक्ष),श्री पुरुषोत्तम शिंदे(उपाध्यक्ष),श्री शैलेश लोखंडे(मुख्य संघटक),श्री सचिन करडे(कोषाध्यक्ष),श्री राजकपुर पठानेकर(भातकुली तालुका संघटक),श्री अमोल इंदोरे (दर्यापुर तालुका संघटक),श्री राजुराव बडगे(अमरावती शहर संघटक),श्री राजेंद्र वैद्य(अचलपुर तालुका संघटक),श्री प्रविण ढोके (नांदगाव खंडेश्वर तालुका संघटक),श्री प्रकाश सुर्यवंशी(जिल्हा संघटक) या समस्त शिलेदारांची नियुक्ती करण्यात आली या समस्त नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा यानंतर आभार श्री अमोलजी इंदोरे यांनी केले बैठकीची सांगता करण्यात आली

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *