घुग्घुस येथे आदिवासी बांधवांच्या खावटी वाटप संपन्न

By : Shivaji selokar

शुक्रवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान येथील जि.प. शाळेत आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक प्रादेशिक कार्यालय-चंद्रपूर व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय-चंद्रपूर जि. चंद्रपूर (यांच्या संयुक्त विद्यमाने) अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजने अंतर्गत अन्नधान्य किट वाटप वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सकाळी अनुदानित आश्रम शाळा केंद्र दुर्गापूर येथील शिक्षकांसह खावटी वाटप करण्यासाठी पाठवण्यात आले.

या प्रसंगी बोलताना आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे उपसरपंच मंगेश राजगडकर म्हणाले की आमचा गरीब समाज चंद्रपूरला जाऊन रोजी बुडवून खावटी आणू शकत नव्हता. आम्ही भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या कडे पाठपुरावा केला त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून घुग्घुस, नकोडा, उसगाव या गावांमधील लाभार्थी आदिवासी बांधवांसाठी घुग्घुस येथील जिल्हा परिषद शाळेत वितरणाची सोय केली.

या प्रसंगी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, आदिवासी समाजाचे नकोडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश राजगडकर, माजी जिल्हा परिषद सभापती नीतू ताई चौधरी, नकोड्याचे सरपंच किरण बांदुरकर, सदस्य रजत तुराणकर, माजी ग्रा.प. सदस्य साजन गोहणे, सुचिता लुटे, मंदेश्वर पेंदोर, शरद गेडाम, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा आदिवासी संस्था नकोडा उपाध्यक्ष राकेश तिरणकर, सचिव विकास मेश्राम, गणेश किंनाके, महेश किंनाके, महेश मडावी, रोशन पेंदोर पवन किंनाके, नैनेश मेश्राम, हिरालाल परचाके, शंकर आत्राम, महेंद्र उईके, बन्सी जुमणाके, राजेंद्र लुटे, अनंता बहादे, सतीश कामतवार, असगर खान, नितीन कटारे, मंगेश पचारे, मधुकर धांडे, सुनंदा लिहीतकर तथा अनेक आदिवासी बांधव या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *