शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन वाहून गेली : वार्डात टँकरने पाणीपुरवठा.


लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी न प चे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू. नागरिकांनी पाणी जपून वापरावे
— नगराध्यक्ष अरुण धोटे.

राजुरा(ता. :–

नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे राजुरा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन वाहून गेल्याने पाणीपुरवठा खंडित झालेला आहे. पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी साधारण तीन आठवड्याचा कालावधी लागणार आहे . यामुळे प्रत्येक वार्डात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नगरपरिषदेने टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केलेला आहे . पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आलेले आहे.

मागील तीन दिवसापूर्वी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नाल्यांना पूर आलेला होता. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक गावांमधील घरेही पाण्याखाली आलेली होती . शेतीचे प्रचंड नुकसान झालेले होते.याच पुराच्या तडाख्यात कोलगाव वरून राजुरा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईप लाइन वाहून गेल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. मुख्य पाईपलाईन वाहून गेल्याने पाणीपुरवठा पूर्ववत नगर परिषद युद्धपातळीवर काम करीत आहे. मात्र नाल्या किनारी प्रचंड दलदल आणि पाणी असल्यामुळे काम करणे आव्हानात्मक आहे . पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी तब्बल तीन आठवड्याचा कालखंड लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे .कोलगाव वरून राजुरा शहराला पुरवठा करण्यासाठी रामपूर येथे शुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी आणले जाते आणि तिथून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र सास्ती जवळील नाल्यावरून पाईपलाईन वाहून गेल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.आज दिनांक 26 जुलैला प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नगराध्यक्ष अरुण धोटे मुख्याधिकारी जुही अर्शिया अभियंता संकेत नंदनशी यांनी स्थळाचे पाहणी केली व कामाला सुरुवात केली. या नैसर्गिक आपत्तीमुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले आहे . टंचाईग्रस्त वार्डात पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

कोट..
अरुण धोटे ,नगराध्यक्ष राजुरा

शहरात पाणिपुरवठा सुरळीत करण्या करिता न.प.मार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे. टॅकरव्दारे व शहरातील कुंपनलिकेव्दारे पाणि टंचाईग्रस्त वार्डात पुरवण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. प्रत्येक वार्डात टॅकर व्दारे पाणि पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी चार टॅंकर लावलेले आहेत .नागरिकाने पाण्याचा जपून वापर करावा.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *