इस्राईल-पॅलेस्टाईन युध्द पेटले….

भारताने बालाकोट हवाई स्ट्राईक केलं.कितने अतिरेकी मारे… त्याची दोन वर्षानंतरही उत्तरं नाहीत. तशाच कारणाने इस्राईल-पॅलेस्टाईन युध्द पेटलं. युध्दाचा अकरावा दिवस. दोन्ही बाजू थांबावयास तयार नाहीत. आर या पारची भाषा आहे. संयुक्त राष्ट्र संघाला जुमानत नाही. कोणाची किती प्राणहानी .किती वित्त हानी. सोयीची मोजदाद आहे. या युध्दाची जड आहे. जेरूसलेम. हे ज्यू, यहुदी व इसाईंचे पवित्र स्थळ. ते संयुक्च राष्ट्र संघाच्या अखत्यारित . तिथं इस्राईलचा हस्तक्षेप वाढला. त्याला पॅलेस्टाईंनी युवकांचा विरोध. इस्राईलची जेरुसलेम घोषित राजधानी. दुतावास कार्यालयही थाटले. पॅलेस्टाईनींचा विरोध आहे. याबाबत युएनओने ठोस भूमिका घेतली नाही. पॅलेस्टाईनमध्ये इस्राईल हे नवे राष्ट्र झालं.1948 च्या वाटाघाटीत 58 टक्के भाग पॅलेस्टाईनला दिला. 44 टक्के इस्राईलला. उर्वरित 8 टक्के भाग संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारित ठेवला. त्यात जेरुसलेमचा समावेश आहे. पॅलेस्टाईनींना हे मान्य नाही. त्यांना जेरूसलेमला राजघानी हवी . यावरून युध्दाचे बार उडत असतात. गाजापट्टी, वेस्टबॅक क्षेत्रही इस्राईलनं बळकावलं. इस्राईल त्याला शत्रूचा प्रदेश म्हणतं. या क्षेत्रांसह पॅलेस्टाईन हवा आहे. यासाठी पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेची स्थापना झाली. युवकांची हमास ही अतिरेकी संघटना. तिला इराणची फुस आहे. 13 एप्रिल हा दिवस ईस्राईलचा स्मृती दिन. त्या कार्यक्रमात भांडण झालं. या भांडणामुळे इस्राईल पोलिसांनी अक्सा मस्जिदवर छापा घातला. मक्का, मदिना नंतर या मस्जिदला स्थान आहे. या घटनेने भांडणाची ठिंणगी पडली. महिनाभरानंतर ती युध्दात बदलली. रक्तपात वाढला. विध्वंस सुरू झाला. त्याचा जबरदस्त फटका पॅलेस्टाईनला बसत आहे.

युध्द नको. ते निषेधार्ह .तरी इस्राईल-पॅलेस्टाईन युध्द पेटले. मध्यस्थी नाही. युध्द दोघांनाही हवं. चार निवडणुका झाल्या.तरी बहुमत नाही. कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या. पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहु आहेत. त्यांना हमास हल्याने संधी मिळाली. सीमांचे रक्षण करण्याचा आम्हाला अधिकार असे म्हणत. दणादण हल्ले केले. पॅलेस्टाईनकडे ना धड सेना. ना युध्द सामुग्री. केवळ मुळनिवासी. इस्राईली उपरे. हा समज. त्या भावनेतून चककमी कायम सुरु असतात. प्रत्येक युध्दात पॅलेस्टाईन काही तरी गमावून बसतं. सात वर्ष शांततेत गेली. आता निवडणुकीची धुसपूस आहे. कोरोनाने निवडणुका टळल्या. नेतन्याहू यांच्यासाठी संधी. हमासचा गांजापट्टी भागात प्रभाव आहे. तेथून इस्राईलवर रॅकेट मारा करतात. सुरवात हमासने केली. त्याला उत्तर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिलं. शंभरावर एअर स्ट्राईक केले. ड्रोनने अश्रूगोळे दागले.रॉकेट हल्ले झाले. मीडिया कार्यालय असलेली 14 मजली इमारत पाडली. शेकडों मुलें व महिला दगावल्या. मानवी मूल्यांचे हनन झाले.

इस्राईल शस्त्र सज्ज राष्ट्र . क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटा. भारताचा दीडशे वां भागा एवढा. श्रीमंतीत आघाडीवर. उपग्रह प्रक्षेपण समता असलेल्यात 8 वां देश. ड्रोन शस्त्र निर्यातीत एकाधिकार. इथं युरोपियन येहुदी,रूसी येहुदी, अमेरिकन यहुदी, अरब येहुदी,इथोपियातून आलेले काळे यहुदीही आहेत. जगभरातील यहुदींचा हा एकमेव देश. हा देश नागरिक नाही. सैनिक तयार करतो.
पॅलेस्टाईन मुस्लिम देश. या देशातील तरुणांनी इस्राईलच्या छळा विरूध्द जिहाद पुकारला. हमास असं त्यांना संबोधल जातं. त्यांचा प्रामुख्याने गाजा भागात बस्तान. त्यांना इराणची साथ. यावेळी 57 मुस्लिम राष्ट्रांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यासाठी साउदी अरबने पुढाकार घेतला. पाकिस्थान व बांगला देशाही सोबत आहे. चीनचे खुले समर्थन आहे. युएनओची बैठक चीनच्या दबावामुळे झाली. तिथं ठोस निर्णय नाही. या भांडणाची मेख तिथ आहे. आठ टक्के क्षेत्र जेरूसेलमचं आहे. तिथं इस्राईल लुडबुड करतो. संयुक्त राष्ट्र संघ दुर्लक्ष करतो. एक कोटीच्या इस्राईलात 20 टक्के मुस्लिम .फाळणीनंतर ते इथेच कायम राहिले. मस्जिद प्रकरणाने ते नाराज. इस्राईलमध्ये गृहयुध्दाची स्थिती. येहुदी-मुस्लिम हिंसेच्या घटना वाढल्या. सरकारने शांततेचे आवाहान केले. इस्राईल आक्रमक आहे. या युध्दात जग दोन गटात विभागला. पॅलेस्टाईनला 57 मुस्लिम राष्ट्रांचे समर्थन आहे. तर इस्राईलच्या बाजूने 25 राष्ट्र आहेत. अनेक राष्ट्र तटस्थ आहेत.भारताने संयुक्त राष्ट्र संघाने ठरवलेली स्थिती कायम राखावी. ही भूमिका घेतली. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचा व्हिडीओ वायरल झालं. त्यात वाजपेयी यांनी सरळ पँलेस्टाईनची बाजू घेतली .युध्द नकोच .चर्चेतून प्रश्न सोडवावे.हे शक्तिशाली राष्ट्रांना मान्य नाही.शस्त्र विक्रीला प्राधन्य.त्यासाठी छोट्या राष्ट्रांना लढवत ठेवतात. संयुक्त राष्ट्र सुरक्षा संघाने आपल्या अखत्यारीतील क्षेत्रात इस्राईलला लुडबुड करण्यास मनाई करावी. ते करीत नाही. भारत-पाक सीमावाद असाच चिघळत ठेवला. राष्ट्र संघाची ही कावेबाजी संपवा. जगात शांतता नांदेल. अन्यथा बळी तो कानपिळी ठरेल. त्यासाठी शस्त्रसाठा वाढेल. परमाणू शस्त्र वापराचा धोका असेल. हे टाळण्यास युध्द नाही. बुध्दाचा मार्ग अंगिकारावा लागेल.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *